Monday, 23 March 2020

Instructions for SSC Students

•••••••••••••••••••••••••••••••••••|
*दहावी विद्यार्थ्यांसाठी सूचना* :---.  |
•••••••••••••••••••••••••••••••••••|
1.प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत हवे.

2.निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करा.

3.बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय,
   बैठक क्रमांकाची खात्री करा.

4.उपस्थिती पत्रिकावर बैठक क्रमांक ,
   बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी
   करा.

5.बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या
   जागेवर चिकटवा.

6.बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक
    लिहा.

7.उत्तरपत्रिकेवर कोणत्याही देवाचे नाव लिहू
   नये, अन्यथा गुण कमी होऊन एका परीक्षेस
   बसता येणार नाही.

8.उत्तरपत्रिकेची पाने सुस्थितीत असल्याची
    खात्री करा.

9.उत्तरपत्रिकेच्या पान क्रमांक तीनपासून
   लिहा .

10.उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिताना
      खाडाखोड करू नका.

11.उत्तरपत्रिकेच्या केवळ डाव्या बाजूस
      समास सोडा.

12.उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे पान फाडू
      नका.

13.उत्तरपत्रिका,पुरवणीवर पर्यवेक्षकांची
      स्वाक्षरी घ्या .

14.कच्चे लिखाण उत्तरपत्रिकेच्या डाव्या
     बाजूला पेन्सिलीने करा.

15.त्या पानावर कच्चे लिखाण असा उल्लेख
     करा.

16.आकृतीसाठी साध्या पेन्सिल वापरा.

17.शेवटच्या अर्धा तासात मुख्य
     उत्तरपत्रिकेवर व पुरवणी घेतली असेल
     तर होलोक्राफ्ट योग्य त्या ठिकाणी
     चिकटवा .

18. मुख्य उत्तरपत्रिकेवरील पुरवणी टेबल
      पूर्ण करा.

19.रिकाम्या पानावर रेषा ओढा.

20. Holocraft स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या
   जागेवर चिकटवा.


All The Best





2 comments: